ही स्त्री कोण? (भाग १)
[ बाईचे बाईपण, तिचे भोग, दुःख ह्या सर्वांचे मूळ शोधण्याच्या उद्देशाने त्या अर्थाच्या मराठी, संस्कृत व इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्ती शोधण्याचा हा प्रयत्न. – संपादक ] माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं – बहिणाबाई (1880-1951) स्त्री-पुरुष हे शब्द नेहमीच फारच सैलसर अर्थाने वापरले जातात. ते जरा नीटस अर्थाने वापरले …